दहावीतील टॉपर २१ विद्यार्थ्यांचा फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये सत्कार; आदर्श विद्यार्थी पुरस्काराने गौरव मोठी घडामोड! टीईटी पेपरफुटीचा कथित मुख्य सूत्रधार बिहारमध्ये जेरबंद यापूर्वी १२ आरोपी अटकेत; भिवंडी पोलिसांच्या कारवाईने तपासाला निर्णायक वळण सिंहगडावर रात्रभर भरकटलेला पर्यटक बेशुद्धावस्थेत; सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे मिळाले जीवदान ‘पीएमपीएमएल’ कुणाच्या घरची संस्था नाही; जनतेच्या हितासाठी कारभार करा! महापौर मंजूषा नागपुरे यांचा प्रशासनाला इशारा; विशेष सभेत लोकप्रतिनिधींचा संताप पुण्यात भरदिवसा गोळीबाराने खळबळ; घोरपडे पेठ आणि लोहियानगरमध्ये दोन घटना, सहा राऊंड फायर सरकारविरोधात पुण्यात ‘जेन झी’चा एल्गार; भरपावसात जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक, नीट पेपरफुटी आणि परीक्षा गैरव्यवहाराविरोधात हजारोंचा तिरंगा मोर्चा

‘थँक्यू फ्रेंड्स!’ नीट पेपरफुटीच्या वादावर पंतप्रधान मोदींचा मध्यरात्री नवा संदेश; विद्यार्थ्यांचे मानले आभार, कठोर कायद्याचे संकेत

देशभरात ‘नीट’ (NEET) आणि इतर स्पर्धा परीक्षांमधील कथित पेपरफुटीच्या घटनांमुळे निर्माण झालेल्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी (२४ जुलै) मध्यरात्री उशिरा इन्स्टाग्रामवर आणखी एक व्हिडिओ प्रसिद्ध करत देशातील तरुणांशी पुन्हा संवाद साधला. यापूर्वी शेअर केलेल्या व्हिडिओला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल त्यांनी विद्यार्थी, पालक आणि तरुणांचे मनापासून आभार मानले. पंतप्रधान मोदी यांनी आपल्या संदेशात म्हटले की, “काल रात्री तुमच्याशी संवाद साधण्याची संधी मिळाली. माझ्या व्हिडिओला दिलेल्या प्रेमाबद्दल, सकारात्मक प्रतिसादाबद्दल आणि मौल्यवान सूचनांबद्दल मी तुमचा मनापासून आभारी आहे. तुमचे हे प्रेम कायम राहो आणि आपले नाते आणखी दृढ व्हावे, हीच अपेक्षा आहे.” याआधी गुरुवारी रात्री पंतप्रधानांनी ‘सेल्फी-स्टाईल’ व्हिडिओद्वारे विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधत ‘नीट’ आणि इतर स्पर्धा परीक्षांमधील पेपरफुटीच्या घटनांबाबत केंद्र सरकारची भूमिका स्पष्ट केली होती. त्यांनी सांगितले की, पेपरफुटी हा केवळ परीक्षेतील गैरप्रकार नसून लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या विश्वासाशी संबंधित अत्यंत गंभीर विषय आहे. पंतप्रधानांनी स्पष्ट केले की, अशा घटनांमुळे विद्यार्थ्यांवर मोठा मानसिक ताण निर्माण होतो. अनेक वर्षांच्या मेहनतीनंतर परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या स्वप्नांवर पाणी फिरते. त्यामुळे या प्रकारांना आळा घालण्यासाठी सरकारने गेल्या अडीच महिन्यांत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले असून, भविष्यात अशा घटना रोखण्यासाठी कठोर उपाययोजना करण्यात येणार आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार पेपरफुटीविरोधात अधिक कठोर कायदेशीर चौकट तयार करण्याच्या तयारीत असल्याचेही पंतप्रधानांनी सांगितले. त्यांनी फास्ट-ट्रॅक न्यायालये स्थापन करण्याचा प्रस्ताव, दोषींवर कठोर शिक्षेची तरतूद आणि अशा प्रकरणांचा जलद निपटारा करण्यासाठी आवश्यक कायदेशीर बदल करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. मंत्रिमंडळातील चर्चेनंतर या प्रस्तावाला अंतिम स्वरूप दिले जाईल आणि संसदेच्या अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्यात संबंधित विधेयक मंजूर करण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचेही त्यांनी नमूद केले. पंतप्रधानांच्या या व्हिडिओला सोशल मीडियावर मोठा प्रतिसाद मिळाला. अवघ्या २४ तासांत या व्हिडिओला सुमारे २८ कोटी व्ह्यूज मिळाल्याचा दावा करण्यात आला असून, लाखो विद्यार्थ्यांनी आणि नागरिकांनी त्यावर प्रतिक्रिया नोंदवत सरकारने पेपरफुटीविरोधात कठोर कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. आपल्या संदेशाच्या शेवटी पंतप्रधान मोदी यांनी विद्यार्थ्यांना विश्वास दिला की, केंद्र सरकार त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. परीक्षांमधील गैरप्रकार करणाऱ्यांविरोधात कोणतीही दयामाया दाखवली जाणार नाही. विद्यार्थ्यांच्या मेहनतीचे संरक्षण करणे आणि देशातील परीक्षा व्यवस्थेवरील विश्वास अधिक मजबूत करणे, हे सरकारचे सर्वोच्च प्राधान्य असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. देशभरातील विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांचे लक्ष आता केंद्र सरकारच्या पुढील निर्णयांकडे लागले असून, पेपरफुटी रोखण्यासाठी प्रस्तावित कायदा आणि फास्ट-ट्रॅक न्यायालयांच्या माध्यमातून परीक्षा व्यवस्थेत अधिक पारदर्शकता आणि विश्वास निर्माण होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

अधिक वाचा

error: Content is protected !!