दहावीतील टॉपर २१ विद्यार्थ्यांचा फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये सत्कार; आदर्श विद्यार्थी पुरस्काराने गौरव मोठी घडामोड! टीईटी पेपरफुटीचा कथित मुख्य सूत्रधार बिहारमध्ये जेरबंद यापूर्वी १२ आरोपी अटकेत; भिवंडी पोलिसांच्या कारवाईने तपासाला निर्णायक वळण सिंहगडावर रात्रभर भरकटलेला पर्यटक बेशुद्धावस्थेत; सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे मिळाले जीवदान ‘पीएमपीएमएल’ कुणाच्या घरची संस्था नाही; जनतेच्या हितासाठी कारभार करा! महापौर मंजूषा नागपुरे यांचा प्रशासनाला इशारा; विशेष सभेत लोकप्रतिनिधींचा संताप पुण्यात भरदिवसा गोळीबाराने खळबळ; घोरपडे पेठ आणि लोहियानगरमध्ये दोन घटना, सहा राऊंड फायर सरकारविरोधात पुण्यात ‘जेन झी’चा एल्गार; भरपावसात जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक, नीट पेपरफुटी आणि परीक्षा गैरव्यवहाराविरोधात हजारोंचा तिरंगा मोर्चा

दहावीतील टॉपर २१ विद्यार्थ्यांचा फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये सत्कार; आदर्श विद्यार्थी पुरस्काराने गौरव

दहावीतील टॉपर २१ विद्यार्थ्यांचा फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये सत्कार; आदर्श विद्यार्थी पुरस्काराने गौरव   सारथी रुग्णहक्क जनसेवा ट्रस्ट, महाराष्ट्र राज्य आणि संहिता प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने दहावीतील गुणवंत व टॉपर २१ विद्यार्थ्यांचा “आदर्श विद्यार्थी पुरस्कार” प्रदान करून विशेष गौरव करण्यात आला. यानिमित्त विद्यार्थ्यांसाठी फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये विशेष भोजनाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना आपल्या आत्मसन्मानाची अनोखी अनुभूती मिळाली. कार्यक्रमाला पिंपरी-चिंचवडचे पोलीस उपायुक्त गणेश इंगळे, मावळचे गटविकास अधिकारी (उच्च श्रेणी) कुलदीप प्रधान, शिक्षणतज्ज्ञ डॉ. बाळासाहेब काळे तसेच उद्योजक अमित शेठ कदम यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना पोलीस उपायुक्त गणेश इंगळे म्हणाले, “नोकरी मिळवणे हे अंतिम ध्येय नसून, मिळालेल्या पदाचा उपयोग प्रामाणिकपणे जनसेवा आणि राष्ट्रसेवेसाठी करणे अधिक महत्त्वाचे आहे. समाजाकडून घेण्यापेक्षा समाजाला काहीतरी देण्याची वृत्ती प्रत्येक तरुणाने जोपासली पाहिजे. प्रत्येक मोठ्या परिवर्तनाची सुरुवात स्वतःपासूनच होते.” गटविकास अधिकारी कुलदीप प्रधान यांनी स्पर्धा परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना प्रेरणा देताना सांगितले की, “यश हे नशिबाने नव्हे, तर जिद्द, शिस्त, सातत्य आणि कठोर परिश्रमाने मिळते. नियमित अभ्यास, उजळणी आणि वेळेचे नियोजन यामुळे कोणतेही ध्येय गाठता येते.” शिक्षणतज्ज्ञ डॉ. बाळासाहेब काळे यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून सांगितले की, “मोठी स्वप्ने पाहा, त्यांना कृतीची जोड द्या आणि घेतलेल्या निर्णयावर ठाम राहून सातत्याने प्रयत्न करा. योग्य निर्णय, आत्मविश्वास आणि परिश्रम यांच्या जोरावर प्रत्येक स्वप्न वास्तवात उतरते.” सारथी रुग्णहक्क जनसेवा ट्रस्ट, महाराष्ट्र राज्यचे अध्यक्ष दिपक हरिभाऊ चौघुले यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना “विचार मोठे ठेवा, स्वप्ने पाहा आणि ती पूर्ण करण्यासाठी अखंड प्रयत्न करा. निश्चितच यश तुमच्या पावलांशी येईल,” असा प्रेरणादायी संदेश दिला. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी ट्रस्टचे योगेश रोहिदास शेवाळे, कुलदीप हरिश्चंद्र नाईकनवरे, सारिका संतोष लोणकर, पद्माजा गणेश गव्हाणे, आकाश भारत झांबरे, सागर नंदकुमार जगताप, राहुल नाईक सागर करंडे आणि श्रेयस दिपक चौघुले यांनी विशेष परिश्रम घेतले. दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान, प्रेरणादायी मार्गदर्शन आणि फाईव्ह स्टार हॉटेलमधील भोजनाचा अनोखा अनुभव यामुळे हा कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी संस्मरणीय ठरला. उपस्थितांनी या उपक्रमाचे कौतुक करत अशा प्रेरणादायी कार्यक्रमांचे आयोजन सातत्याने व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.

Leave a Comment

error: Content is protected !!